भाजपाची कसब्यातून हेमंत रासने, चिंचवड मधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी

पुणे: पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *