# पुणे विभागात 1905 रुग्ण कोरोनाबाधित; आजपर्यंत एकूण 99 रुग्णांचा मृत्यू.

 

पुणे: पुणे विभागातील 305 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज गुरूवारी दिली.

विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 30 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 13 बाधित रुग्ण आहेत.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत. तर 268 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधित 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *