प्रतिकात्मक छायाचित्र
नवी दिल्लीः केंद्र सरकारने ३ मेनंतर दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन लागू राहील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ४ मेनंतर काही सवलती दिल्या जातील. मात्र, या कालावधीत रेल्वे आणि विमानसेवा बंदच राहील. कोणत्याही प्रकारचे दळवळण सुरू होणार नाही. ग्रीन झोनमध्ये मात्र आर्थिक व्यवहारांना परवानगी दिली जाईल, असे नव्याने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
लॉकडाऊन टप्पा-३ मध्ये शाळा, महाविद्यालये, अन्य शैक्षणिक संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. मॉल्स, पब्सही उघडणार नाहीत. सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम रहातील. मोठ्या संख्येने लोक एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्सला सवलत देण्यात आली असून, या भागांत जीवनावश्यक वस्तूंखेरीज अन्य वस्तूंची डिलिव्हरी करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही व्यवहार सुरू होतील. कोणते व्यवहार सुरू करायचे आणि कोणते बंद ठेवायचे याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. मात्र, रेड झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार सुरू होणार नाहीत, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहेत. ग्रीन झोनमध्ये बससेवा सुरू करता येईल. मात्र, बसमध्ये अर्धेच प्रवाशी बसतील. म्हणजेच ५० आसन क्षमतेच्या बसमध्ये केवळ २५ प्रवाशीच प्रवास करू शकतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्याचा कालावधी २५ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत होता. त्यानंतर लॉकडाऊनचा १९ दिवसांचा दुसरा टप्पा घोषित करण्यात आला. त्याचा कालावधी १५ एप्रिलपासून ३ मेपर्यंतचा आहे. यामध्ये वाढ होऊन आता नवी दिल्लीः केंद्र सरकारने ३ मेनंतर दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन लागू राहील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ४ मेनंतर काही सवलती दिल्या जातील, मात्र या कालावधीत रेल्वे आणि विमानसेवा बंदच राहील. कोणत्याही प्रकारचे दळवळण सुरू होणार नाही. ग्रीन झोनमध्ये मात्र आर्थिक व्यवहारांना परवानगी दिली जाईल, असे नव्याने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
लॉकडाऊन टप्पा-३ मध्ये शाळा, महाविद्यालये, अन्य शैक्षणिक संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील.मॉल्स, पब्सही उघडणार नाहीत. सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम रहातील. मोठ्या संख्येने लोक एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्सला सवलत देण्यात आली असून या भागांत जीवनावश्यक वस्तूंखेरीज अन्य वस्तूंची डिलिव्हरी करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही व्यवहार सुरू होतील. कोणते व्यवहार सुरू करायचे आणि कोणते बंद ठेवायचे याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. मात्र रेड झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार सुरू होणार नाहीत, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहेत. ग्रीन झोनमध्ये बससेवा सुरू करता येईल. मात्र बसमध्ये अर्धेच प्रवाशी बसतील. म्हणजेच ५० आसन क्षमतेच्या बसमध्ये केवळ २५ प्रवाशीच प्रवास करू शकतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सर्वात आधी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्याचा कालावधी २५ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत होता. त्यानंतर लॉकडाऊनचा १९ दिवसांचा दुसरा टप्पा घोषित करण्यात आला. त्याचा कालावधी १५ एप्रिलपासून ३ मेपर्यंतचा आहे. त्याउमधे वाढ होऊन आता १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन लागू राहील.