# औरंगाबादेत लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी दिलासा: माहिती पाठवा, खात्री करून तत्काळ ऑनलाइन पास मिळणार.

 

औरंगाबाद: औरंगाबादेत लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी व औरंगाबाद बाहेरच्यांना औरंगाबादेत येण्यासाठी पोलिसांनी दिलासा दिला आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा परराज्यात जाण्यासाठी तसेच इतर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून औरंगाबाद जिल्ह्यात येण्यासाठी  http://covid19.mhpolice.in   लिंकचा वापर करावा. यात आपली संपूर्ण माहिती भरून सबमिट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून तत्काळ ऑनलाइन पास देण्याची कारवाई करण्यात येणार आहे. शहरासाठी ही कार्यवाही पोलीस आयुक्तालयामार्फत केली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागासाठी ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. नागरिकांनी याव्यतिरिक्त कोठेही पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे  आवाहन पोलीस  प्रशासनाने केले आहे. यासाठी प्रथम आपला फॉर्म नीट भरला असल्याबाबत खात्री करावी  तरीदेखील याबाबत अडचण आल्यास या 0240 2331077 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय कोणतेही राज्य किंवा विभागीय किंवा जिल्हा नोडल अधिकारी यांना फोन करण्याची किंवा मेसेज करण्याची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *