# सर्व प्रवाशी रेल्वेसेवा बंद; केवळ श्रमीक विशेष गाड्या सुरू, अन्य कुणीही रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये.

संग्रहित छायाचित्र

नांदेड: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता दिनांक १७ मे २०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या बंद राहतील. या कालावधीत रेल्वे माल आणि पार्सल वाहतूक सुरु राहील.

लॉकडाऊन मुळे विविध स्थळी अडकलेले मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक आणि या परिस्थितीमुळे अडकलेले इतर लोक ज्यांना संबंधित राज्य सरकार ने ओळखून नोंद केली आहे अशा व्यक्तीकरता श्रमीक विशेष गाड्या चालविण्याचे ठरविण्यात आले आहे. या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या फक्त राज्य सरकारच्या विनंतीवरुन आणि गृहमंत्रालयाच्या दिशा निर्देशानुसार चालविण्यात येतील.

वर उल्लेखित पैकी ज्यांना कुणाला या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी संबंधित राज्य सरकारच्या कार्यालयात संपर्क करावा.
कुणाही व्यक्तिला किंवा व्यक्ती समूहाला रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष किंवा कुणाच्याही शिफारशीने या गाड्यामधे प्रवास करण्याकरिता तिकिट विकत मिळणार नाही, याची सर्व जनतेने नोंद घ्यावी. यामुळे कुणीही रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये. राज्य सरकारची परवानगी असल्याखेरीज कुणालाही या विशेष रेल्वे गाड्यामधे तसेच स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही, याची जनतेने नोंद घ्यावी. पुन्हा रेल्वे प्रशासनातर्फे जनतेला विनंती करण्यात येते की कुणीही रेल्वे स्थानकावर थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न करु नये तसेच गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *