पुणे: पुणे विभागातील 463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 147 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 571 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 72 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 147 बाधित रुग्ण असून 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 912 बाधित रुग्ण असून 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 74 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 114 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 33 बाधित रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 14 बाधित रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 22 हजार 604 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 21 हजार 446 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 125 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 19 हजार 266 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 2 हजार 147 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 71 लाख 46 हजार 385 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 84 हजार 598 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 624 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.