# औरंगाबादेत आज 24 रुग्णांची वाढ; एकूण 321 कोरोनाबाधित, खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू.

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 24 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 321 झाले आहेत. कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) जयभीम नगर (21), अजब नगर (1), संजय नगर (1), बौद्ध नगर (1) या परिसरातील आहेत. यामध्ये 14 पुरूष आणि दहा महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

दरम्यान, शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भडकल गेट, टाऊन हॉल येथील 58 वर्षीय कोरोना रूग्णाचा आज उपचारादरम्यान सकाळी 8.30 वाजता मृत्यू झाला. त्यांना 27 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिआ आणि कोरोना असल्याचे रुग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *