पुणे: पुणे विभागातील 673 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 574 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 764 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 287 बाधित रुग्ण असून 608 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यात 92 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 145 बाधित रुग्ण असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 35 बाधित रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 15 बाधित रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 26 हजार 326 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 25 हजार 4 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 322 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 22 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 2 हजार 574 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 12 लाख 96 हजार 465 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.