# पुणे विभागातील 912 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज; विभागात एकूण 3023 कोरोनाबाधित रुग्ण.

 

पुणे: पुणे विभागातील 912 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 23 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 948 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 92 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 3 हजार 23 बाधित रुग्ण असून163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 2 हजार 657 बाधित रुग्ण असून 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 827 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 684 आहे. तर 85 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यात 115 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 20 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 93 आहे.

सोलापूर जिल्ह्यात 196 बाधित रुग्ण असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 154 आहे.

सांगली जिल्ह्यात 37 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर 27 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 18 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 9 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे.

आजपर्यंत विभागात एकूण 30 हजार 618 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 29 हजार 610 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 374 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 26 हजार 244 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 3 हजार 23 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागात 88 लाख 49 हजार 655 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 3 कोटी 81 लाख 47 हजार 952 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 159 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *