# पुणे विभागात 1023 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज; एकूण 168 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाबाधित 3242 रुग्ण.

 

पुणे: पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 242 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 51 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 104 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 830 बाधित रुग्ण असून 938 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 96 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील 119 कोरोनाबाधित रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 238 कोरोना बाधित रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 196 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 37 कोरोनाबाधित रुग्ण असून 27 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 18 कोरोनाबाधित रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 32 हजार 498 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 30 हजार 809 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 689 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 27 हजार 508 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 3 हजार 242 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 90 लाख 80 हजार 526 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 92 लाख 20 हजार 147 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 167 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *