नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत सोमवार, 11 मे रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ट्वीटरवर दिली आहे.
देशभरात लाॅकडाऊन झाल्यानंतर यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी चार वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. उद्या ते पाचव्यांदा संवाद साधणार आहेत. सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपणार असल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.