पुणे: कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्याथी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाकरिता नियोजनासाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वये अधिकाऱ्यांची पुढील आदेशापर्यंत निश्चित नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे (मो.नं.9423043030) यांच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांच्या संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडून यादी प्राप्त करुन घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झाल्याबाबतची खात्री करणे. तसेच त्या संबंधित राज्याकडून परवानगी घेणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे व त्यांना संबंधित राज्यामध्ये पाठविण्यासाठी बस, रेल्वे याबाबतची व्यवस्था करणे इ.जबाबदारी देण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे (मो.नं.9075748361) यांच्याकडे पुणे महानगरपालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे. उपजिल्हाधिकारी, नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय, पुणे हिम्मत खराडे (मो.नं.9422072572) यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे.
उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.17 आरती भोसले (मो.नं.9822332298) यांच्याकडे ग्रामीण हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे तर सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्थलांतरित कामगारांना पुणे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करुन संबंधित जिल्ह्याकडून परवानगी प्राप्त करुन घेऊन संबंधितांना त्या त्या जिल्ह्यामध्ये पाठविणेकामी बसची व्यवस्था करणे. तसेच पुणे जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.