पुणे: पुणे शहर व परिसरात कोरोनाच्या वाढत्या संसाराच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण खात्याने स्वतंत्र आदेश जारी करून बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकार आता जमाबंदी आयुक्त आणि संचालक एस. चोक्कलिंगम यांच्याकडे दिले आहेत.
बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे डीन डाॅ. अजय चंदनवाले यांची गेल्या महिन्यात मुंबईला बदली झाल्याने प्रशासकीय अधिकार पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. सध्या शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण खात्याने गुरूवार, 14 मे रोजी स्वतंत्र आदेश जारी करून बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक एस. चोक्कलिंगम यांच्याकडे दिले आहेत.