# पुणे विभागात आज 7 रुग्णांचा मृत्यू; आजपर्यंत एकूण 210 जणांचा मृत्यू, विभागात कोरोनाबाधित 4020 रूग्ण.

 

पुणे: पुणे विभागातील 1 हजार 886 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 20 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 924 आहेत. विभागात कोरोनाबाधित 7 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 210 झाली आहे. तसेच 145 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 3 हजार 490 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 1 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 603 आहे. कोरोनाबाधित एकूण 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 133 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील 125 कोरोनाबाधित रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 88 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 336 कोरोनाबाधित रुग्ण असून 110 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 205 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 43 कोरोनाबाधित रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 26 कोरोनाबाधित रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *