औरंगाबाद: शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मागील 14 तासांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
कोरोनाबाधित असलेल्या 35 वर्षीय महिलेचा आज रविवारी सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच संजय नगरमधील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर जलाल कॉलनी येथील 32 वर्षीय पुरूष रुग्णाचा 16 मे रोजी रात्री 9 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही कळविण्यात आले आहे.