# पुणे विभागात आज 322 रूग्णांची नव्याने भर; एकूण 4593 कोरोनाबाधित रुग्ण.

पुणे: पुणे विभागातील 2 हजार 218 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज नव्याने 322 रूग्णांची भर पडल्याने विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 593 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण 2 हजार 146 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 168 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज रविवारी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 4 हजार 1 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 1 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 842 आहे. कोरोनाबाधित एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधित रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधित रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात २८१, सोलापूर जिल्ह्यात २५, कोल्हापूर जिल्ह्यात ७, सांगली जिल्ह्यात ६ व सातारा जिल्ह्यात ३ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 129 कोरोनाबाधित रुग्ण असून 66 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 61 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 378 कोरोनाबाधित रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 50 कोरोनाबाधित रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 35 कोरोनाबाधित रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *