अंबाजोगाई: विनोद नरहररराव रापतवार यांची महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयात वरिष्ठ सहायक संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान, त्यांची रिक्त असलेल्या नांदेड जिल्हा माहिती अधिकारी (DIO) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे माहिती संचालक अजय अंबेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. माहिती जनसंपर्क संचालनालयाचे संचालक यांनी काढलेल्या आदेशानुसार विनोद रापतवार हे मंगळवार, 26 मे रोजी आपला पदभार स्वीकारुन कामकाज सुरु करणार आहेत.