पुणे: पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 178 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यात 5 हजार 616 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 444 आहे. कोरोनाबाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधित रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 336 बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 249, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 22, सांगली जिल्ह्यात 3 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात 278 कोरोनाबाधित रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 157 आहे. कोरोनाबाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 570 कोरोनाबाधित रुग्ण असून 249 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. कोरोनाबाधित एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात 73 कोरोनाबाधित रुग्ण असून 40 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 286 कोरोनाबाधित रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 271 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.