पुणे: पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजार 218 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 435 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यात 5 हजार 899 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 623 आहे. कोरोनाबाधित एकूण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधित रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 395 बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 283, सातारा जिल्ह्यात 31, सोलापूर जिल्ह्यात 20, सांगली जिल्ह्यात 6 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात 309 कोरोनाबाधित रुग्ण असून 120 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 182 आहे. कोरोनाबाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 590 कोरोनाबाधित रुग्ण असून 265 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 273 आहे. कोरोनाबाधित एकूण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात 79 कोरोनाबाधित रुग्ण असून 46 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 341 कोरोनाबाधित रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 326 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 72 हजार 855 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 64 हजार 607 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 288 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 57 हजार 280 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 7 हजार 218 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.