नांदेड: कोरेानाशी दोन हात करणारे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह व माणुसकीला काळे फासणारा मजकूर लिहणार्या युवकावर बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत आक्षेपार्ह व भावना दुखावणारा मजकूर लिहण्यावरून काँगेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. ते या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी राज्यासह जिल्हाभरातून त्यांचे समर्थक व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पक्षामधील नेतेमंडळी प्रार्थना करत होते. दरम्यान, सिडको भागात राहणार्या गोविंद पाटील कदम शिरशीकर याने, आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती.
याप्रकरणी गोविंद पाटील कदम शिरशीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार सुधाकर भिलवंडे, नजीर बागवान, नजीर फरिदसाब शेख, फारुख महेबूब बेग पटेल यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गोविंद शिरशीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.