# पुणे विभागातील 3841 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी;  विभागात 8122 रुग्ण.

 

पुणे: पुणे विभागातील 3 हजार 841 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 604 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 355 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 394 कोरोना बाधीत रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 653 कोरोना बाधीत रुग्ण असून 297 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 292 आहे. कोरोना बाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 88 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 39 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 383 कोरोना बाधीत रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 360 आहे. कोरोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *