# जालन्यातही शंभरी पार; आज 24 रूग्णांची भर पडल्याने एकूण 110 कोरोना पॉझिटिव्ह.

 

जालना:  जालना जिल्ह्यात आज गुरूवारी कोरोनाचा भडका उडाला. एकाचवेळी 24 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जालना जिल्ह्याने शंभरी पार केली आहे. आता एकूण आकडा 110 वर पोहचल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

या 24 जणांमध्ये अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील सहाजणांचा समावेश असून अंबड येथील शारदा नगरमधील 5,  अंबड तालुक्यातील काटखेडा 5, बदनापूर 1, राज्य राखीव दलातील 1 जवान आणि कोविड केअर सेंटरमधील 6 जणांचा समावेश आहे. अंबड येथील शारदा नगरमधील 5 जण हे नुकतेच घाटकोपर मुंबई येथून परतले असून कोविड केअर सेंटरमधील 6 जण आणि इतर 12 असे 18 रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याची माहिती देण्यात आली. आज एकाच दिवशी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *