# पुणे विभागात आजपर्यंत 446 रुग्णांचा मृत्यू; विभागात एकूण कोरोनाबाधित 9,749 रुग्ण.

पुणे: पुणे विभागातील 5 हजार 63 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 हजार 749 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 220 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 216 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 7 हजार 670 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 4 हजार 350 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 988 आहे. कोरोनाबाधित एकूण 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 382 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 229, सातारा जिल्ह्यात 34, सोलापूर जिल्ह्यात 52, सांगली जिल्ह्यात 9 कोल्हापूर जिल्ह्यात 58 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 516 कोरोनाबाधित रुग्ण असून 158 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हायातील 891 कोरोनाबाधित रुग्ण असून 380 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 427 आहे. कोरोनाबाधित एकूण 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 110 रुग्ण असून 57 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 562 कोरोनाबाधित रुग्ण असून 118 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 439 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *