जालना: जालना शहरात आज सोमवारी फिजिकल डिस्टन्सिंगची वाट लावत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनाची भीती अजिबात न बाळगता लोक रस्त्यावर उतरले होते. लाॅकडाऊन नंतर अनलाॅक काय असते त्याचा दर्शन आज शहरात घडले.
शहरातील सुभाष रोड, म. फुले मार्केट, सावरकर चौक, महावीर चौक, म. गांधी रोड, जवाहर बाग या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वर्दळीच्या फुले मार्केट परिसरात तर एवढी गर्दी झाली होती की लोक रेटारेटी करत होते. शासनाच्या नवीन दिशा निर्देशानुसार दुचाकीवर एकालाच परवानगी असताना इथे तर दुचाकीवर बसून अख्खे कुटुंबच जाताना दिसले. भविष्यातील धोका ओळखून जिल्हा प्रशासन व पोलिसांनी यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.