# पुणे विभागात आज 382 रूग्णांची वाढ; एकूण रूग्णसंख्या 11हजार 86.

 

पुणे:  पुणे विभागातील 6  हजार 241 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या  11  हजार 86  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 334 आहेl. विभागात कोरोनाबाधfत एकूण 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 8 हजार 604 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 5 हजार 203 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 18 आहे. कोरोनाबाधित एकूण 383  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 382 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 9, सोलापूर जिल्ह्यात 55, सांगली जिल्ह्यात 2,  कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 578 कोरोनाबाधीत रुग्ण असून 223  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 331 आहे. कोरोनाबाधित एकूण 24  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 1135 कोरोनाबाधित रुग्ण असून 476 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  565 आहे. कोरोनाबाधित एकूण 94  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोनाबाधित 124 रुग्ण असून 70 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 50  आहे. कोरोनाबाधित एकूण 4  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 645  कोरोनाबाधित  रुग्ण असून 269 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 370 आहे. कोरोनाबाधित एकूण 6  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *