# पुणे विभागात 6,981 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज; विभागात 11,723 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 203 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 231 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 9 हजार 115 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 5 हजार 637 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 77 आहे. कोरोनाबाधित एकूण 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 220 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्ण संख्येमध्ये एकूण 283 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 199, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 50, सांगली जिल्ह्यात 9, कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 618 कोरोनाबाधित रुग्ण असून 260 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 332 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 194 कोरोनाबाधित रुग्ण असून 586 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 507 आहे. कोरोनाबाधित एकूण 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 137 रुग्ण असून 79 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 54 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 659 कोरोनाबाधित रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 233 आहे. कोरोनाबाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 98 हजार 394 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 94 हजार 343 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 51 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 82 हजार 461 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 11 हजार 723 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *