# पुणे विभागात आज 491 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ.

पुणे: पुणे विभागातील 7 हजार 390 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 214 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 262 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 253 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज रविवारी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 9 हजार 523 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 5 हजार 936 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 409 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.33 टक्के आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आज एकूण 491 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 408, सातारा जिल्ह्यात 3, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 621 कोरोनाबाधित रुग्ण असून 303 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 292 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 1263 कोरोनाबाधित रुग्ण असून 647 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 501 आहे. कोरोनाबाधित एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 142 कोरोनाबाधित रुग्ण असून 85 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 53 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 665 कोरोना बाधित रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 238 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *