# हर्सूल जेलमधील 2 अधिकाऱ्यांसह 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण.

 

औरंगाबाद:  काही दिवसापूर्वी हर्सूल जेलमधील दोन कैद्यांना कोरोना झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. दरम्यान, हर्सूल जेलमधील 2 अधिकाऱ्यांसह 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हर्सूल जेलमधील अधिकारी कर्मचारी मिळून 60 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये 2 अधिकारी व 12 कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या सर्वांना हर्सूल कारागृहाच्या बाहेरील 2 बंगल्यात कोरंन्टाईन करण्यात आले आहे.

मे महिन्यामध्ये हर्सूल जेलमधील दोन कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर काही दिवसांनी तब्बल 29 कैद्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले होते. या 29 कैद्यांच्या संख्येने एकाच दिवसात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 104 झाली होती. एकाच दिवसात शंभरपेक्षा जास्त कोरोना बाधित आढळण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ होती. बुधवारीही (दि 10) तब्बल 114 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *