# पुणे विभागातील 9,105 कोरोनाबाधित बरे होऊन घरी; विभागात 14,650 रुग्ण.

 

पुणे: पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 887 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 11 हजार 397 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 7 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 263 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.38 टक्के आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 573 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 424, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 108, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 718 कोरोनाबाधित रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 612 कोरोनाबाधित रुग्ण असून 814 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 661 आहे. कोरोनाबाधित एकूण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 213 कोरोनाबाधित रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 101 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 710 कोरोनाबाधित रुग्ण असून 603 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *