# मराठवाड्यासह कोकण, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा.

 

पुणे: अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे कोकणासह, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, मराठवाडा आणि विदर्भात येत्या ४८ ते ७२ तासात मुसळधार पावसाचा असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा फटका कोकण किनारपट्टीलाही बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरबी समुद्रपार करीत मान्सून देशाच्या ६० टक्के भागात पोहोचला. यामध्ये केरळपासून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियानापर्यंत मान्सून दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *