# पुणे विभागात आज 365 रूग्णांची वाढ; एकूण 15,563 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 9 हजार 778 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 563 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 83 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 12 हजार 147 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 7 हजार 619 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 27 आहे. कोरोनाबाधित एकूण 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.12 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 365 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 270, सातारा जिल्ह्यात 12 , सोलापूर जिल्ह्यात 63, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात एकाही रूग्णाची वाढ झालेली नाही.

सातारा जिल्ह्यातील 738 कोरोनाबाधित रुग्ण असून 508 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 196 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 722 कोरोनाबाधित रुग्ण असून 911 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 659 आहे. कोरोनाबाधित एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 236 कोरोनाबाधित रुग्ण असून 117 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 112 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 720 कोरोनाबाधित रुग्ण असून 623 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 89 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *