पुणे: पुणे विभागातील 10 हजार 156 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 893 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 21 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.90 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 12 हजार 389 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 7 हजार 922 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 952 आहे. कोरोनाबाधित एकूण 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 330 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 242, सातारा जिल्ह्यात 7, सोलापूर जिल्ह्यात 65, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 745 कोरोना बाधित रुग्ण असून 537 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 174 आहे. कोरोनाबाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 787 कोरोनाबाधित रुग्ण असून 942 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 693 आहे. कोरोनाबाधित एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 247 रुग्ण असून 121 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 119 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 725 रुग्ण असून 634 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 21 हजार 4 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 17 हजार 379 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 625 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 1 हजार 228 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 15 हजार 893 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.