# पुणे विभागात आज सर्वाधिक 576 कोरोनाबाधितांची वाढ.

पुणे: पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 469 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 269आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.48 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.52 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 12 हजार 919 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 8 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.89 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 576 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 530, सातारा जिल्ह्यात 21, सोलापूर जिल्ह्यात 24, कोल्हापूर जिल्ह्यात 1 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 766 कोरोनाबाधित रुग्ण असून 560 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 171 आहेत. कोरोनाबाधित एकूण 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 811 कोरोनाबाधित रुग्ण असून 996 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 655 आहे. कोरोनाबाधित एकूण 160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 247 रुग्ण असून 130 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 110 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 726 रुग्ण असून 644 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *