# राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर; रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम -आरोग्यमंत्री राजेश टोपे.

 

मुंबई: राज्यातील रुग्णवाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३ नमुन्यांपैकी १ लाख २० हजार ५०४ नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे-९९ (मुंबई ६७, भिवंडी २७, ठाणे ४, वसई-विरार १), नागपूर-१ (नागपूर मनपा१).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५७५१ झाली आहे.

९ मार्च २०२० रोजी राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर मागील सुमारे ३ महिन्याच्या काळात राज्यातील रुग्ण वाढीचा वेग (साप्ताहिक सरासरी) क्रमशः कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोविड १९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
३१ मार्च: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी १२ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी ३.५ दिवस
३० एप्रिल: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ७ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी १०.२ दिवस
३१ मे: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ४ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी २०.१ दिवस
१६ जून: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ३ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी २५.९ दिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *