# संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास नकार देणार्‍यावर पुण्यात गुन्हा दाखल.

 

पुणे: विमानाने लंडनहून आलेल्या तरूण प्रवाशाने संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास नकार दिला. तसेच परस्पर घरी गेल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (पुणे ग्रामीण) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. असे असूनसुद्धा अश्विन कुमार सिंग (वय वर्षे 31) हे दिनांक 16 जून रोजी विमानाने लंडन येथून मुंबईला आले व नंतर हांडेवाडी (तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील त्यांच्या घरी परस्पर निघून गेले. त्यावेळी कार्यरत असलेल्या पुणे महापालिकेचे नोडल अधिकारी अजित सणस यांनी घरी जाऊन त्याला समजावून सांगितले. तथापि, त्यांनी इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाईन होण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या आदेशावरुन संबंधितांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51, महाराष्ट्र कोविड 19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2 प्रमाणे प्रगती उल्हास कोरडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा दाखल केला असल्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *