पुणे: पुणे विभागातील 11 हजार 969 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 हजार 408 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 628 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 811 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 446 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.67 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.18 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 15 हजार 511 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 9 हजार 257 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 670 आहे. कोरोनाबाधित एकूण 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 342 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.77 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 876 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 786, सातारा जिल्ह्यात 18, सोलापूर जिल्ह्यात 64, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 818 रुग्ण असून 624 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 155 आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 69 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 241 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 656 आहे. कोरोनाबाधित एकूण 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 276 कोरोनाबाधित रुग्ण असून 171 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 734 रुग्ण असून 676 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.