# पुणे विभागात आज 524 रूग्णांची वाढ; आजपर्यंत एकूण 830 कोरोनाबाधितांचा मृत्यू.

पुणे: पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 हजार 932 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 835 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 466 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 15 हजार 942 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 9 हजार 446 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 852 आहे. कोरोनाबाधित एकूण 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 350 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.57 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 524 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 431, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 57, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 4 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 838 रुग्ण असून 643 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 156 आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 126 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 266 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 679 आहे. कोरोनाबाधित एकूण 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 288 कोरोनाबाधित रुग्ण असून 180 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 100 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 738 रुग्ण असून 682 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 48 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *