# पुणे विभागात 20 हजारांवर रूग्ण; आज 484 कोरोनाबाधितांची वाढ.

पुणे: पुणे विभागातील 12 हजार 639 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 हजार 416 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 909 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 467 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.91 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 16 हजार 385 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 9 हजार 791 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 986 आहे. कोरोनाबाधित एकूण 608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 355 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.76 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.71 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 484 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 443, सातारा जिल्ह्यात 6, सोलापूर जिल्ह्यात 28 , सांगली जिल्ह्यात 3 तर कोल्हापूर जिल्ह्यात 4 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 844 रुग्ण असून 668 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 137 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 154 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 310 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 640 आहेत. कोरोनाबाधित एकूण 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 291 रुग्ण असून 186 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 96 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 742 कोरोनाबाधित रुग्ण असून 684 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 40 हजार 575 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 38 हजार 889 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 686 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 18 हजार 148 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 20 हजार 416 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *