# पुणे जिल्ह्यात आज 889 रूग्णांची वाढ; विभागात एकूण 21हजार 353 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 13 हजार 189 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 हजार 353 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 7 हजार 256 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 466 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.77 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 17 हजार 274 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 10 हजार 288 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 365 आहे. कोरोनाबाधित एकूण 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 360 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.56 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.59 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 937 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 889, सातारा जिल्ह्यात 6, सोलापूर जिल्ह्यात 33, सांगली जिल्ह्यात 02 तर कोल्हापूर जिल्ह्यात 07 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 850 रुग्ण असून 678 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 132 आहे. कोरोनाबाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 187 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 328 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 629 आहे. कोरोनाबाधित एकूण 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 293 रुग्ण असून 192 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 92 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 749 कोरोनाबाधित रुग्ण असून 703 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 38 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *