# पुणे विभागात आज सर्वाधिक 1110 रूग्णांची वाढ; एकूण 23 हजार 159 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 13 हजार 917 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 हजार 159 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 8 हजार 283 आहे. विभागात कोरोनाबाधित एकुण 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.09 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 18 हजार 840 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 10 हजार 889 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 373 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.80 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 110 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 935, सातारा जिल्ह्यात 24, सोलापूर जिल्ह्यात 131, सांगली जिल्ह्यात 7 तर कोल्हापूर जिल्ह्यात 13 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 888 रुग्ण असून 689 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 158 आहे. कोरोनाबाधित एकूण 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 340 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 425 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 673 आहे. कोरोनाबाधित एकूण 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 313 रुग्ण असून 204 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 778 कोरोनाबाधित रुग्ण असून 710 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 59 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *