पुणे: पुणे विभागातील 16 हजार 372 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 हजार 974 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 531 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 588 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.70 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 22 हजार 135 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 13 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 414 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 25 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 898, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 79, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 31 रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 268 आहे. कोरोनाबाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 609 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 733 आहे. कोरोनाबाधित एकूण 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 360 रुग्ण असून 226 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 122 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 839 कोरोनाबाधित रुग्ण असून 716 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 113 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.