# पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह.

 

पुणे:  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे. दरम्यान, आपण लवकरच यातून बरे होऊन पुन्हा तुमच्या सेवेत येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, थोडासा ताप आल्याने मी माझी टेस्ट केली असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पुणे विभागात आतापर्यंत 19 हजार 652 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 हजार 886 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 12 हजार 45 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *