पुणे: पुणे विभागातील 20 हजार 916 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35 हजार 409 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 13 हजार 242 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 648 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.07 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.53 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 29 हजार 403 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 17 हजार 329 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 199 आहे. कोरोनाबाधित एकूण 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 492 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.98 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 552 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 356 , सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 109, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 334 रुग्ण असून 791 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 488 ॲक्टीव रुग्ण संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 211 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 786 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 129 आहे. कोरोनाबाधित एकूण 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 495 रुग्ण असून 267 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 216 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 966 कोरोनाबाधित रुग्ण असून 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 210 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 2 लाख 6 हजार 270 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 2 हजार 243 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 27 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 66 हजार 467 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 35 हजार 409 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.