औरंगाबाद: शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जनतेच्या अहर्निश सेवेत असणारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. नितीन साळवे यांच्यासह अन्य दोन माजी नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मंगळवार, 7 जुलै रोजी उपचारदरम्यान माजी नगरसेवक नितीन साळवे (वय43) यांची प्राणज्योत मालवल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा प्रकोप शहरात सुरूच असून, माजी नगरसेवकाचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नितीन साळवे शिवसेनेचे शिवशंकर काॅलनी परिसराचे माजी नगरसेवक होते. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात नागरिकांच्या मदतीसाठी काम करणारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. नितीन साळवे यांच्यासह अन्य दोन माजी नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. साळवे यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अन्य दोन माजी नगरसेवकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.