मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या १३६४ झाली आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 98 झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, आजपर्यंत मुंबईत सर्वाधिक ५४ जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यात आज 6 जणांचा, तर सातारा येथे 1 मृत्यू झाल्याने एकूण बळीची संख्या 25 झाली आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर १३६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १२५ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
२५ रुग्णांचा मृत्यू
आज राज्यात २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूपैंकी पुण्यातील १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी१ रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. २५ मृत्यूंपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
जिल्हा आणि मनपा निहायरुग्णांचा तपशीलः
मुंबईः ८७६ (मृत्यूः५४)
पुणे मनपाः १८१ (मृत्यूः २४)
पुणे (ग्रामीण) ०६
पिंपरी चिंचवड मनपाः १९
सांगलीः २६
ठाणे मनपाः २६ (मृत्यूः०३)
कल्याण डोंबिवली मनपाः ३२ (मृत्यूः ०२)
नवी मुंबई मनपाः ३१ (मृत्यूः ०२)
मीरा भाईंदरः ०४ (मृत्यूः ०१)
वसई-विरार मनपाः ११ (मृत्यूः ०२)
पनवेल मनपाः ०६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यूः०१)- प्रत्येकी ०३
नागपूरः १९ (मृत्यूः ०१)
अहमदनगर मनपाः १६
अहमदनगर ग्रामीणः ०९
उस्मानाबाद, अमरावती मनपा (मृत्यूः २), यवतमाळ, रत्नागिरी (मृत्यूः ०२)-प्रत्येकी ०४
लातूर मनपाः ०८
औरंगाबाद मनपाः १६ (मृत्यूः ०१)
बुलढाणाः ११ ( मृत्यूः ०१)
साताराः ०६ (मृत्यूः ०2)
अकोलाः ०९
कोल्हापूर मनपाः ०५
मालेगावः ०५ (मृत्यूः ०१)
उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशिम, बीड, सिंधुदुर्गः प्रत्येकी १ (मृत्यूः१ जळगाव )
एकूणः १३६७ मृत्यूः 98