# पुणे जिल्ह्यात आज 1हजार 436 रूग्णांची वाढ; विभागात एकूण 44हजार 75 कोरोनाबाधित.

 

पुणे: पुणे विभागातील 26 हजार 419 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44 हजार 75 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 16 हजार 209 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 591 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.28 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 36 हजार 964 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 22 हजार 180 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 767 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 5, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 831 व पुणे कॅन्टोन्मेंट 77, खडकी विभागातील 53, ग्रामीण क्षेत्रातील 735, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 66 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 812, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 106 व पुणे कॅन्टोन्मेंट 25, खडकी विभागातील 13, ग्रामीण क्षेत्रातील 41, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 20 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 402 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.00 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 711 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 436, सातारा जिल्ह्यात 51, सोलापूर जिल्ह्यात 122, सांगली जिल्ह्यात 27 तर कोल्हापूर जिल्ह्यात 75 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 543 रुग्ण असून 950 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 528 आहे. कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 821 कोरोनाबाधित रुग्ण असून 2 हजार 193 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 301 आहे. कोरोनाबाधित एकूण 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 608 रुग्ण असून 293 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 139 कोरोनाबाधित रुग्ण असून 803 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 313 आहे. कोरोनाबाधित एकूण 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *