# हल्ला बोल.. ओलीची बोली…

‘ओली’ची बोली कळे त्यांच्या विचारांची खोली
म्हणे श्रीराम असे आमुचा, माफ कर श्रीरामा त्यांना
कळेना त्यांची त्यांनाच बोली…

म्हणे भारतातील अयोध्येत असे वाद
आमच्याकडे आहे अपवाद
खुर्ची डळमळीत झाल्याने ओढवून घेत आहेत वाद…

प्रभू श्रीरामा कर त्यांना माफ, साठी बुद्धी झाली नाटी
आता तूच हाण या नाठाळांच्या माथी काठी…

प्रभू श्रीरामा उचलून तू शिवधनुष्य घे वेध या स्वार्थी राजकारण्यांचा
जेणेकरून हिम्मत होणार नाही असे म्हणण्याची प्रभू श्रीराम आमुचा…
-विलास इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *