# भूमी अभिलेखच्या 125 कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती.

औरंगाबाद:  भूमी अभिलेख औरंगाबाद विभागाचे उपसंचालक संजय ढिकले यांनी पुढाकार घेतल्यामुळे मराठवाड्यातील 125 कर्मचाऱ्यांना 10 वर्षाचा कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस आर. एम. कांबळे यांनी उपसंचालक संजय ढिकले यांचे संघटनेच्या वतीने स्वागत केले. तसेच पदोन्नती मिळाल्याने मराठवाड्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला असून उपसंचालक ढिकले यांचे आभार व्यक्त केले आहे.

याबरोबरच वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती मिळाल्याने संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्राचार्य कृष्णात कणसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव, कार्यालय अधीक्षक संदीप गोसावी, वरिष्ठ लिपिक मदन सिंघल यांचाही सत्कार करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयास सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *