# लातूर जिल्ह्यात निर्बंधावर शनिवारपासून 31 जुलैपर्यंत अंशत: बदल; काय सुरू काय बंद वाचा सविस्तर.

लातूर: लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून लातूर जिल्ह्यात दिनांक 15 जुलै ते 31 जुलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काही आस्थाापना अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादित स्वरुपात व निर्बंधासह सुरु ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 21 जुलै ते 24 जुलै 2020 या कालावधीकरीता कांही बाबींकरीता शिथीलता देण्याबत आली होती. परंतु शिथिलता दिल्याने बाजारपेठ / सार्वजनीक ठिकाणी शारीरिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे तसेच कांही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर शिथिलता मागे घेवून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी 25 जुलै ते 31 जुलै 2020 या कालावधीकरीता खालीलप्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील या आस्थापना 31 पर्यंत बंद राहतील:

भाजीपाला व फळांची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील. Zomato, Swigy व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील. सार्वजनिक/ खाजगी क्रीडांगणे / मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning walk व Evening walk प्रतिबंधीत राहील. उपाहारगृह बार, लॉज, हॉटेल्स (कोविड-19 करीता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. सर्व केश कर्तनालय/सलून/ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील. मटन, चिकन, अंडी, मासे इत्याादीची विक्री संपूर्णतः बंद राहील. शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील.

सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील तथापी, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादीसाठी संपूर्णतः बंद राहील. तथापि, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे लातूर महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य् व केंद्रीय विभागाचे कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यवक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदर आदेशातून वगळण्यात येत आहे. सर्व प्रकारचे बांधकाम संपूर्णतः बंद राहील. तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्ययवस्था (In-Situ construction) असेल तरच त्यांना काम सुरु ठेवता येईल.

सर्व चित्रपटगृह, व्या‍यामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील. या आदेशानुसार लागू करण्यात येत असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय असेल. सामाजीक / राजकीय / क्रीडा / मनोरंजन / सांस्कृतिक / धार्मीक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील. धार्मीक स्थ्ळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

खालील बाबी/ सेवा स्वरुपात सुरु राहतील:

सर्व किराणा मालाचे ठोक विक्रेते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना दुपारी 12.00 पर्यंत दुकान न उघडता घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल. दूध विक्री व वितरण सकाळी 10.00 वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील. तथापी दूध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सालय सेवा नियमीत वेळेनुसार सुरु राहतील. सर्व रुग्णाबये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही. अन्यथा संबंधित संस्था कारवाईस पात्र राहील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्याबाबत असलेली औषध विक्री दुकाने दिनांक 31 जुलैपर्यंत 24 तास सुरु ठेवता येतील. इतर ठिकाणी असलेली मेडीकल दुकाने 31 जुलैपर्यंत सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत सुरु ठेवता येतील.

E-Commerce सेवा उदा. Amazon, Flipkart व तत्सम सेवा (अत्यावश्यक व इतर) घरपोच सुरु राहतील. सर्व मा. न्यासयालये व राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक संस्थेची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील. शक्य‍ असल्यास Work from home चा पर्याय वापरण्यारत यावा. शासकीय कर्मचा-यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही, तथापि स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. पेट्रोलपंप व गॅसपंप सुरु राहतील. परंतु सदर ठिकाणी अत्याावश्यवक सेवेतील (पोलीस, आरोग्य विभाग इतर शासकीय विभाग) वाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांची वाहने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे खाजगी आस्थापनाचे (घरगुती गॅस वितरक, पिण्याचे पाणी पुरविणारे इत्याादी ) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्यात येईल. स्वतःचे ओळखपत्र, गणवेश असणे आवश्यक राहील.

एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे. सॉ-मील (लाकडाचे दुकान) केवळ स्मशानभूमीच्या बाजूला असेल तरच सुरु ठेवता येईल. इतर ठिकाणी बंद राहतील. औद्योगीक व इतर वस्तूची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा्, आंतरराज्य वाहतूक, शासकीय नियमानुसार सुरु राहील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 06.00 ते 09.00 या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील. पाणीपुरवठा करणारे टँकरला नियमानुसार परवानगी राहील. संस्थाात्मक अलगीकरण / विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्याता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील. सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील. बँकेच्या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील.

संपूर्ण लातूर जिल्ह्यातील मा. न्यायालयाचे कर्मचारी, अधिकरी, मा. न्यायाधीश, वकील, शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्ट्र नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे,खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे व वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच कन्टेन्मेंट झोनकरीता नियुक्त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्वतः करीता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.  औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. बी-बियाणे, शेतीसाठी लागणारी औषधे, रस्सी, ताडपत्रीची दुकाने सकाळी 07.00 ते 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. अन्न प्रक्रिया (Food Processing) व शेतमालाशी कृषी निगडीत प्रक्रिया उदयोग, कारखाने सुरु ठेवता येतील. मात्र, कर्मचा-यांनी त्यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी work from home चा पर्याय वापरावा. अत्यावश्य्क वाहनांना साहित्य पुरविणारे अॅटोमोबाईल्स, शेतीसाठीचे फवारणी यंत्र दुरुस्ती दुकाने यांना सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत आस्थापना सुरु ठेवता येतील. सर्व वैद्यकीय, व्यावसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्बुलन्स यांना जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी परवानगी राहील. वाहनांचे अधिकृत सर्विंस सेंटर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्यांच्या कर्मचा-यांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक राहील.

वृध्द व आजारी व्यक्तींकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सरु राहतील. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्या मशागतीस मुभा असेल. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. कामाच्या ठिकाणी शारीरिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील. ज्या ठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खरेदी केली जाते अशी सुपर मार्केटस् (डी मार्ट, पुरुषोत्तम मार्केट, विश्व सुपर मार्केट, बिग बाझार इत्यादी) बंद राहतील. परंतु ऑनलाईन/दूरध्वनीवरुन प्राप्त ऑर्डरनुसार दुपारी 12.00 वाजेपर्यंत घरपोच साहित्य वितरीत करता येईल. घरपोच सेवा पुरविणा-या व्याक्तीस गणवेश व ओळखपत्र असणे आवश्यक आहे. शिवभोजन थाळीचे उपाहारगृह बंद राहतील. अत्यावश्यक सेवेशी निगडीत नसलेले कारखाने/उद्योग कामाच्या ठिकाणी मजुरांच्या राहण्याची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील.
पाणीपुरवठा (जार, टँकर) दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. इंटरनेटसारख्या संपर्क साधनांसंबंधी सेवा पुरविणा-या संस्थांना त्यांच्या आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु ठेवता येईल. सर्व ऑनलाईन सेवा पुरवणिारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुरु राहतील. अत्यावश्ययक सेवेतील संस्था (CSC घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्यादी) यांना दैनिक व्यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्यलवहारासाठी बॅकेत ये-जा करणेसाठी व व्यवहार करणेसाठी परवानगी असेल. बँकेतील व्येवहारासाठी ये-जा करणा-या व्यक्तीस संस्थेचा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही बाबी बंधनकारक राहतील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यतक्ती, संस्था, अथवा समूह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचेविरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *