बीड: बीड शहरातील शाहूनगर , मिलिया कॉलेज परिसर, बालेपीरमधील राजूनगर व संभाजीनगर येथील काही भाग व तसेच बीड तालुक्यातील चौसाळा हे गाव, गेवराई शहरातील मोमीनपुरा, इस्लामपुरा, संजयनगर, कोल्हेर रोड, धारूर शहरातील साठेनगर आणि माजलगाव शहरातील जुना मोंढा या भागात संबंधित परिसरातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून, परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
पाटोदा, केज, आष्टी तालुक्यातील तीन गावातही कंटेन्मेंट झोन शिथिल
पाटोदा तालुक्यातील बेनसूर, केज तालुक्यातील केकानवाडी आणि आष्टी तालुक्यातील देवी निमगाव या ३ गावातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून, परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
या ठिकाणीही प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.